www.24taas.com, बालेश्वर
भारतानं गुरुवारी बालेश्वरपासून काही अंतरावर स्थित चांदीपूरमध्ये एका भारतीय बनावटीच्या या अण्विक शस्त्रास्त्र वाहक क्षमता असणाऱ्या क्षेपणास्त्राचं यशस्वी परिक्षण केलंय. या क्षेपणास्त्रच्या हल्ल्याची क्षमता ३५० किलोमीटर इतकी आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जमिनीवरून हल्ला करण्यासाठी सक्षम असणाऱ्या या क्षेपणास्त्राचं आज सकाळी ९.२१ वाजता प्रक्षेपण झालं. ‘स्टॅटेजिक फोर्सेस कमांड’च्या अभ्यासाद्वारे या क्षेपणास्त्राचं परिक्षण करण्यात आलंय.
सूत्रांच्या माहितीनुसार या क्षेपणास्त्राला निर्माण भांडारातून निवड करण्यात आली होती. ‘पृथ्वी २’ ला डीआरडीओनं विकसित केलंय. याअगोदरच या क्षेपणास्त्राचा समावेश भारतीय सशस्त्र दलामध्ये करण्यात आलाय.
पृथ्वी- २ चं याआधी ४ ऑक्टोबर २०१२ रोजी याच प्रक्षेपण केंद्रात परीक्षण करण्यात आलं होतं. हे क्षेपणास्त्र ५०० ते १००० किलोग्रॅम वजनाचं आण्विक शस्त्र वाहतुकीसाठी सक्षम आहेत. या क्षेपणास्त्राला दोन इंजिन आहेत. योग्य दिशेनं उड्डाण करण्यासाठी या क्षेपणास्त्रात आधुनिक यंत्रप्रणालीचा वापर करण्यात आलाय.