‘बलात्कार भारतात नाही, ‘इंडिया’त होतात’

बलात्कार `इंडियात` होतात, भारतात होत नाहीत, असं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी म्हटलंय.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Jan 4, 2013, 08:40 PM IST

www.24taas.com, नवी दिल्ली
दिल्ली बलात्कारावर उलटसुटल विधानं येणं सुरूच आहे. बलात्कार `इंडियात` होतात, भारतात होत नाहीत, असं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी म्हटलंय. यावर राजकीय पडसाद उमटल्यानंतर संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक राम माधव यांनी स्पष्टिकरण दिलंय. महिलांना आदर देणं ही भारताची संस्कृती आहे. इंडियात मात्र महिलांना उपभोगाची वस्तू समजलं जातं, असं माधव म्हणाले.

पश्चिमी संस्कृतीचा भारतावर प्रभाव पडल्यानं शहरांमध्ये जास्त बलात्कार होतात, गावांमध्ये मात्र बलात्काराची संख्या कमी आहे, असं म्हणताना, भागवत यांनी ‘पश्चिमी संस्कृतीच्या पगाड्यामुळं बलात्कार भारतात नाही तर इंडियात होतात’ असं विधान केलं होतं.