बिहारमध्ये पैशांचा पाऊस, १० लाखांच्या नोटा हवेत

पैशांच्या लुटीची बातमी तर तुम्ही नेहमीच वाचता, मात्र जहानाबादमध्ये पैशांचा पाऊस पडला, जवळ-जवळ १० लाख रूपयांचा. एका युवकाने आपल्या पिशवीतून एक-एक नोट हवेत उडवली. या नोटा लुटण्यासाठी आजूबाजूच्या लोकांमध्ये झुंबड उडाली. यानंतर ५०० रूपयाचा या नोटा घेऊन लोक दिसेनासे झाले.

Updated: Mar 28, 2016, 01:04 PM IST
बिहारमध्ये पैशांचा पाऊस, १० लाखांच्या नोटा हवेत title=

पाटणा : पैशांच्या लुटीची बातमी तर तुम्ही नेहमीच वाचता, मात्र जहानाबादमध्ये पैशांचा पाऊस पडला, जवळ-जवळ १० लाख रूपयांचा. एका युवकाने आपल्या पिशवीतून एक-एक नोट हवेत उडवली. या नोटा लुटण्यासाठी आजूबाजूच्या लोकांमध्ये झुंबड उडाली. यानंतर ५०० रूपयाचा या नोटा घेऊन लोक दिसेनासे झाले.

यानंतर पोलीस आले, पैसे उडवणारा व्यक्ती कोण होता, याचा तपास केल्यानंतर संजय गुप्ता या व्यक्तीने पैस उडवल्याचं सांगण्यात आलं, याविषयी संजय गुप्ता यांच्या घरी पोलीस आल्यानंतर, त्यांची मानसिक स्थिती ठिक नसल्याने त्यांनी असं केलं असावं असा अंदाज व्यक्त करण्यात आला.

प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, संजय गुप्ता यांना नदीत अंघोळ केल्यानंतर संगम तटावर बॅगेतून पैसे काढून हवेत उडवले, यानंतर पोलीसांनी काही लोकांच्या घरी छापा टाकून १५ हजार रूपये जप्त केले आहेत, पोलिसांकडून आणखी लोकांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी केली जाणार आहे.