मान्सून अंदमान निकोबार बेटांवर दाखल

गेले अनेक महिने ज्याची अख्खा भारत चातकासारखी वाट बघतो, तो अखेर आलाय. होय...मान्सून अंदमान निकोबार बेटांवर दाखल झालाय. 

Updated: May 18, 2016, 07:23 PM IST
मान्सून अंदमान निकोबार बेटांवर दाखल  title=

मुंबई : गेले अनेक महिने ज्याची अख्खा भारत चातकासारखी वाट बघतो, तो अखेर आलाय. होय...मान्सून अंदमान निकोबार बेटांवर दाखल झालाय. 

पुणे आणि कुलाबा अशा दोन्ही वेधशाळांनी घडामोडीला दुजोरा दिलाय. पुणे वेधशाळेंनं कालच निकोबारमध्ये मान्सून आगमन कुठल्याही क्षणी होईल असं भाकित वर्तवलं होतं. २४ तासांच्या आतच मान्सूनं हे भाकीत खरं ठरवलंय. 

गेल्याच आठवड्यात मान्सूनच्या प्रगतीसाठी पोषक वातावरण असल्यामुळे सरासरीपेक्षा यंदा अंदमान-निकोबार बेटांमध्ये मान्सूनचे आगमन लवकर होईल, अशी शक्यता वेधशाळेने वर्तविली होती. त्याप्रमाणे बुधवारी मान्सून अंदमान-निकोबारमध्ये दाखल झाल्याची माहिती वेधशाळेकडून देण्यात आली.