जम्मू : पृथ्वीवरील स्वर्ग समजला जाणा-या जम्मू-काश्मीरमध्ये सध्या पुरानं थैमान घातलंय. गेल्या 60 वर्षांतला सर्वात भयानक असा पूर जम्मू-काश्मीरमध्ये आलाय. या पुरानं १७५ पेक्षा जास्त बळी घेतलेत. महाराष्ट्र सरकार १० कोटी रुपयांची मदत करणार आहे.
2 सप्टेंबरपासून सुरू असलेला पाऊस गेल्या दोन दिवसांपासून मात्र कमी झालाय. मात्र आता पुढच्या 24 तासांत पुन्हा मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्यानं वर्तवलीय. महाराष्ट्र सरकारकडून १० कोटींची मदत. मदत आणि बचावकार्यासाठी २० बोटी रवाना करणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली.
पुन्हा मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आल्याने जम्मू-काश्मीरमधील परिस्थिती आणखीनच खराब होऊ शकते. श्रीनगरच्या लाल चौकातही सगळीकडे पाणीच पाणी आहे. जम्मूच्या आरएसपुरा भागात पुरामुळे सर्वात जास्त नुकसान झालंय. पुरामुळे अनेक लोकांनी घरांच्या छतावर आश्रय घेतलाय. याठिकाणी चीता आणि एडव्हांस लाईट हेलिकॉप्टरच्या माध्यमातून जनतेला मदत केली जातेय.
लष्करासह एअरफोर्स, एनडीआरएफच्या टीमकडून बचावकार्य सुरू आहे. लष्करानं आत्तापर्यंत साडेतेविस हजार नागरिकांचा जीव वाचवलाय. जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्ग लँडस्लाईडमुळे बंद आहे... तसंच वैष्णोदेवीची यात्रा जुन्या मार्गानं सुरू करण्यात आलीय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.