गुडगाव : आईच्या लिव्ह इन पार्टनरने तिच्या २० वर्षीय मुलीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना गुडगावच्या लक्ष्मण विहार फेज २ भागात घडलीये.
पीडित तरुणीची आई ओम प्रकाश नावाच्या व्यक्तीसोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये होतेी. तिची आई ओम प्रकाशसोबत लग्न करणार होती. तेव्हापासून ओमप्रकाश पीडिताला त्रास देत होता.
पाच डिसेंबर रोजी जेव्हा पीडिताची आई घरी नव्हती त्यावेळी आरोपी तेथे आला आणि चाकूचे भय दाखवून त्याने तिच्यावर बलात्कार केला. याप्रकरणी पीडित तरुणीने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. तसेच पीडित तरुणीने आईविरोधातही आरोपीचा गुन्हा लपविण्यास मदत केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केलाय.