बिजनोर : जमीयत उलेमा-ए-हिंन्दचे महासचिव मौलाना महमूद मदनी यांनी शनिवारी बोलतांना इस्लामची 'दहशतवादी' अशी प्रतिमा बनवण्यास मुसलमानच कारणीभूत आहेत. या प्रतिमेला बदलण्यासाठी त्यांना सामूहिक शिक्षण देण्याची गरज आहे.
'मुसलमानांनी २० वर्षाचा शिक्षणाचा अजेंडा निश्चित केला पाहिजे आणि उपशीपोटी झोपणाऱ्या मुलाला सुद्धा प्राथमिक आणि माध्यमिक दिलं पाहिजे, त्यानंतर निश्चितच ज्या लोकांच्या मनात मुसलमानांबद्दल द्वेश आहे, ते सुद्धा मुसलमानांवर प्रेम करायला तयार होतील.
तसेच इस्लामला शत्रुंनी नाही तर आपण स्वत: बदनाम केलं आहे', असे किरतपूर येथील धार्मिक कार्यक्रमात बोलतांना मौलाना मदनी यांनी सांगितले.
मदनी यांनी बोलतांना म्हणाले की, 'आपला रस्ता चुकीचा आहे. इस्लामबद्दल दहशतवादी अशी प्रतिमा बनवण्यास कारणीभूत आपल्याच समुदायातील काही लोक आहेत.
मुसलमान खरे देशभक्त आहेत कारण फाळणीच्या वेळेस पर्याय उपलब्ध असतांनासुद्धा त्यांनी भारतात राहणे पसंत केले. त्यामुळे भारतात कोणताही सामूहिक खंड न पडणे, ही आपलीही जबाबदारी आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.