मुस्लिमांनी केला एका काश्मीरी पंडिताचा अंत्यसंस्कार

भारत प्रशासित काश्मीरच्या कुलगाम जिल्ह्यातील मालवन गावात जानकीनाथ हे एकटे पंडित होते ज्यांनी काश्मीर सोडून जाण्यास नकार दिला होता.

Updated: Feb 4, 2016, 05:16 PM IST
मुस्लिमांनी केला एका काश्मीरी पंडिताचा अंत्यसंस्कार title=
सौ. बीबीसी

नवी दिल्ली : भारत प्रशासित काश्मीरच्या कुलगाम जिल्ह्यातील मालवन गावात जानकीनाथ हे एकटे पंडित होते ज्यांनी काश्मीर सोडून जाण्यास नकार दिला होता.

काही दिवसांपूर्वी ८४ व्या वर्षी त्यांनी या जगाचा निरोप घेतला. यावेळी, त्यांच्या अंत्यसंस्काराची सगळी या गावातील मुस्लिमांनी स्वत:च्या खांद्यावर घेतली. भरलेल्या डोळ्यांनी त्यांनी जानकीनाथ यांना निरोप दिला. 

सरकारी नोकरीतून निवृत्त झाल्यानं गेल्या काही वर्षांपासून, जानकीनाथ आजारी होते. त्यांच्या पत्नीचीही प्रकृती सध्या फारशी चांगली नाही. त्यांची एक मुलगी आहे जिचं लग्न झालंय... जानकीनाथ यांचा मृत्यू झाला त्यावेळी त्यांची मुलगीही घरी नव्हती.

१९९० साली सशस्त्र आंदोलन सुरू झाल्यानंतर भारत प्रशासित काश्मीरमधून लाखो पंडितांनी आपल्या घर-जमीनीवर पाणी सोडून इथून निघून जाण्याचा निर्णय घेतला होता. ते भारताच्या दुसऱ्या राज्यांत जाऊन स्थायिक झाले होते.