CCTV फुटेज : बीडी मागितली म्हणून तरुणाला बेदम मारहाण!

क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादात एका व्यक्तीला मरेपर्यंत मारहाण करण्यात आलीय. चार जणांनी मिळून ही मारहाण केल्याचं सीसीटीव्ही फुटेजमधून स्पष्ट दिसतंय. 

Updated: Feb 4, 2016, 03:44 PM IST
CCTV फुटेज : बीडी मागितली म्हणून तरुणाला बेदम मारहाण! title=

नवी दिल्ली : क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादात एका व्यक्तीला मरेपर्यंत मारहाण करण्यात आलीय. चार जणांनी मिळून ही मारहाण केल्याचं सीसीटीव्ही फुटेजमधून स्पष्ट दिसतंय. 

अक्षय नावाच्या तरुणानं बीडी मागितली म्हणून त्याला ही मारहाण करण्यात आलीय. फरीदाबादमध्ये ही घटना घडलीय. अक्षय सध्या दिल्लीच्या सफदरजंग हॉस्पीटलमध्ये गंभीर अवस्थेत आहे. 

धक्कादायक म्हणजे, बीडी मागितल्याचं निमित्त झालं आणि वादानंतर चार जणांनी अक्षयला बेदम मारहाण केली इतकंच नाही तर त्याच्या शरीरावर लघवीही केली. ही सगळी दृश्यं सीसीटीव्हीमध्ये स्पष्ट दिसतायत.