www.24taas.com, हैदराबाद
बाबरी मशिद वादावर भाष्य करून मजलिस-ए- इत्तेहादूल मुस्लिमीन (एमआयएम) चे अध्यक्ष असादुद्दिन ओवैसी यांनी पुन्हा नवा वाद निर्माण केला आहे. आयोध्येत पाडण्यात आलेल्या बाबरी मशिदीची एक इंच जागाही मुस्लिम समाज सोडणार नाही असा दावा ओवैसी यांनी केला आहे.
एमआयएमचे अध्यक्ष ओवैसी यांचं म्हणणं आहे, की बाबरी मशिदीच्या प्रकरणात मुस्लिम समाजावर अन्याय झाला आहे. जर देशात शांतता हवी असेल, तर मुस्लिम समाजाला न्याय मिळालाच पाहिजे. येत्या ६ डिसेंबरला बाबरी मशिद पाडण्याला २० वर्षं पूर्ण होतील.
बाबरी मशिदीबद्दल बोलताना ओवैसी यांनी बाबरी मशिदीसाठी कायदेशीर लढाई करणाऱ्या ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाच्या यशासाठी सर्व मुस्लिम समाजाने प्रार्थना करावी, असं आवाहन केलं आहे. याच वेळी युनायटेडमुस्लिम ऍक्शन कमिटीचे समन्वयक रहीम कुरेशी यांनी आपल्या भाषणात म्हटलं, की मुस्लिम समाज बाबरी मशिद प्रकरणी झालेला अन्याय कधीच विसरणार नाही. मुस्लिमांना न्याय मिळालाच पाहिजे.