www.24taas.com, वृत्तसंस्था, नवी दिल्ली
दिल्लीतील तंदूर कांड नावाने बहूचर्चित असलेलं नैना सहानी हत्याकांडप्रकरणी आज सर्वोच्च न्यायालय निकाल देणार आहे. दिल्ली युवक काँग्रेसचा माजी अध्यक्ष सुशील शर्मा या प्रकरणी आरोपी आहे.
२ जुलै १९९५ साली सुशील शर्माने पत्नी नैना सहानीची दिल्लीतील गोल मार्केट येथील आपल्या राहत्या घरी गोळी मारुन हत्या केली होती. आणि पुरावे मिटविण्यासाठी सुशीलने आपला मित्र केशव कुमारच्या बगिया रेस्टॉरंटमध्ये नैनाचे छोटे छोटे तुकडे करुन तंदूरमध्ये जाळण्याचा प्रयत्न केला होता.
नोव्हेंबर २००३ साली सत्र न्यायालयाने याप्रकरणी सुशीलला फाशीची शिक्षा सुनावली होती. बगिया रेस्टॉरन्टचा मालक केशवकुमार यालाही पुरावे मिटवण्याच्या आरोपाखाली सात वर्षांची शिक्षा झाली. आरोपी सुशीलने दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र तिथेही त्याची शिक्षा कायम ठेवण्यात आली होती. त्यानंतर १९ एप्रिल २००७ साली सुशिलने या शिक्षेविरोधात सुप्रिम कोर्टात धाव घेतली. याप्रकरणी सुप्रिम कोर्ट आज निकाल देणार आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.