नरेंद्र मोदींनी अखेर तोंड उघडले, काँग्रेसवर निशाणा

भाजपच्या नुकत्याच संपलेल्या संसदीय पक्षाच्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर निशाणा साधलाय. काँग्रेस जाणूनबूजन देशाच्या विकासाला अडथळा आणत असल्याचंही मोदींनी यावेळी म्हटलं.

PTI | Updated: Aug 11, 2015, 03:58 PM IST
नरेंद्र मोदींनी अखेर तोंड उघडले, काँग्रेसवर निशाणा  title=

नवी दिल्ली : भाजपच्या नुकत्याच संपलेल्या संसदीय पक्षाच्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर निशाणा साधलाय. काँग्रेस जाणूनबूजन देशाच्या विकासाला अडथळा आणत असल्याचंही मोदींनी यावेळी म्हटलं.

गेल्या तीन आठवड्यापासून विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये उद्धवलेला वाद मिटवण्यासाठी मुलायम सिंह यादवांनी काल पुढाकार घेतला. मुलायमसिंहाच्या या पुढाकाराचं पंतप्रधानांनी कौतुक केलंय. संसदेतील कोंडीबाबत मोदींनी कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त केली नव्हती. सुषमा स्वराज प्रकणी मोदींनी काहीही स्पष्टीकरण दिले नव्हते. त्यामुळे गप्प का, असा सवाल उपस्थित करण्यात येत होता.

दरम्यान, आयपीएलचे माजी कमिशनर ललित मोदी प्रकरण आणि मध्य प्रदेशातील व्यापम घोटाळ्यावरून आक्रमक झालेल्या काँग्रेसनं लोकसभेत धिंगाणा घातला. लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी वारंवार सांगूनही काँग्रेसच्या खासदारांनी संसदेत फलक झळकावलेच, पण प्रत्यक्षात अध्यक्षांच्या खुर्चीसमोर येऊन घोषणाबाजी करत जोरदार गोंधळ घातला. परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज, मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंग चौहान आणि राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांचे राजीनामे घ्यावेत, अशी काँग्रेसची मागणी आहे. त्यासाठी गेल्या तीन आठवड्यांपासून काँग्रेसनं संसदेचं कामकाज रोखून धरलंय.

संसदेचं कामकाज होत नसल्यामुळे भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी नाराज झालेत. लोकसभेत काँग्रेस खासदारांचा गोंधळ सुरू असताना साडेबाराच्या सुमारास आडवाणी उठून बाहेर गेले. त्यांनी गृहमंत्री राजनाथ सिंग यांच्याशी सुमारे १० मिनिटं याबाबत चर्चाही केली.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.