पूर्ण बहुमतासह गोव्यात सरकार स्थापणार - नरेंद्र मोदी

गोव्यात भाजपची सत्ता आल्यास गोव्याला देशातलं सर्वोत्तम राज्य बनवू अशी, ग्वाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलीय.

Updated: Jan 28, 2017, 09:26 PM IST
पूर्ण बहुमतासह गोव्यात सरकार स्थापणार - नरेंद्र मोदी  title=

पणजी : गोव्यात भाजपची सत्ता आल्यास गोव्याला देशातलं सर्वोत्तम राज्य बनवू अशी, ग्वाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलीय.

गोव्यात 4 फेब्रुवारीला होणाऱ्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींची जाहीर सभा पार पडली. या प्रचारसभेत मोदींनी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला.

काँग्रेसच्या भ्रष्टाचाराचा यावेळी मोदींनी पाढाच वाचला. गोवा हे छोट्या राज्यातील सगळ्यात चमकतं राज्य असून मोठ्या राज्यांपुढे शिकण्यासाठी प्रेरीत केले आहे असं मोदी म्हणालेत.

अस्थिरता हा गोव्याला लागलेला रोग असून हा रोगमुक्त करण्याची ही निवडणूक असेल, असंही मोदींनी म्हटलंय.

काय म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी

- छोट्या राज्यांत चमकतं राज्य म्हणजे गोवा - नरेंद्र मोदी

- गोव्यानं इतर राज्यांपुढे आदर्श ठेवला - नरेंद्र मोदी

- अस्थिरता ही गोव्याची मोठी समस्या - मोदी

- पूर्ण बहुमतासह गोव्यात सरकार स्थापणार - नरेंद्र मोदी

- आम्ही टुरिझम नियमांमध्ये बदल केले - मोदी

- विविध क्षेत्रांत गोवा प्रगती पथावर - मोदी

- गोव्यानं 10 वर्षांत डझनभर मुख्यमंत्री पाहिले - मोदी

- गोव्याला देशातील सुरक्षित राज्य बनवणार - मोदी

- गोव्यानं देशाला मजबूत सुरक्षामंत्री दिलाय... 

- संपूर्ण जग सर्जिकल स्ट्राईकची चर्चा करतंय - मोदी