तुमच्या आई-वडिलांसारखंच जीवन तुम्ही जगणार?, मोदींचा सवाल

लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदींची गोव्यात विजय संकल्प रॅलीसाठी उपस्थित झाले. त्यांनी इथं आपल्या भाषणानं लोकांवर प्रभाव पाडण्याचा प्रयत्न केलाय. यावेळी त्यांनी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Jan 12, 2014, 10:30 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, पणजी
लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदींची गोव्यात विजय संकल्प रॅलीसाठी उपस्थित झाले. त्यांनी इथं आपल्या भाषणानं लोकांवर प्रभाव पाडण्याचा प्रयत्न केलाय. यावेळी त्यांनी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला.
काँग्रेसवर वोट बँकेचं राजकारण करत असल्याचा आरोप करत भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी तोंडसुख घेतलं. यावेळी, त्यांनी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचाही चांगलाच समाचार घेतलाय.
‘त्यांची हिंमत तर पाहा... ते सांप्रदायिक राजकारण करण्याचा प्रयत्न करत आहेत. गृहमंत्र्यांनी सर्व राज्य सरकारांना पत्र लिहिलंय, की जर तुम्ही कोणत्याही कायदा-व्यवस्था भंग करणाऱ्याला पकडत आहात तर हे जरूर पाहा की तुम्ही मुस्लिमांना तर अटक करत नाहीत ना... असं का? सगळ्या गुन्हेगारांनासाठी एकच न्याय हवा गुन्हेगारांचा कोणताही धर्म नसतो’ असं मोदींनी यावेळी म्हटलंय.

काँग्रेसपासून देशाला मुक्ती... हा अनेक प्रश्नांवर एकच उपाय आहे... जर तुम्हालाही तुमच्या आई-वडिलांप्रमाणे रडत-कढत जीवन जगायचं नसेल तर काँग्रेसला धूळ चारणं महत्त्वाचं आहे, असं सांगताना मोदींचा रोख तरुणांकडे होता.

पाहुयात, आणखी काय काय म्हटलंय मोदींनी आपल्या भाषणात...
* आमचा एकच धर्मग्रंथ - संविधान
* आमचा एकच नारा - सर्वांची साथ, सर्वांचा विकास
* भाजपचा एकच धर्म - इंडिया फर्स्ट
* सुशीलकुमार शिंदेंनी मुख्यमंत्र्यांना पाठवली होती पत्र
* मुस्लिम गुन्हेगारांना न पकडण्याचा दिला होता आदेश - मोदी
* गुन्हेगारांचा कोणताही धर्म नसतो - मोदी
* सुशीलकुमार शिंदेंवर मोदींचा हल्लाबोल
* सगळ्या गुन्हेगारांनासाठी एकच न्याय हवा - मोदी
* त्रासापासून मुक्ती म्हणजे काँग्रेसपासून मुक्ती
* काँग्रेस ही एक विकृत व्यवस्था
* देशातील बेरोजगारी काँग्रेसमुळे वाढली
* संविधानिक संस्थांची प्रतिष्ठा वाढवणार - मोदी
* विकेंद्रीकरणावर आमचा विश्वास - मोदी
* एकवीसाव्या शतकासाठी देशाला तयार केलं नाही - मोदी
* त्यांनी जो अपमान सहन केला तसंच तुम्हाला जगायचंय? - मोदी
* तुमच्या आई-वडिलांनी हा त्रास भोगलाय - मोदी
* काँग्रेसला भ्रष्टाचाराबद्दल चाड नाही - मोदी
* काँग्रेसच्या रोगातून देशाला मुक्त करायचंय - मोदी
* भाजपनं चहा विकणाऱ्याला पंतप्रधानपदाचा उमेदवार बनवलंय - मोदी
* मनोहर पर्रिकरांसारखा नेता निवडल्याबद्दल धन्यवाद-मोदी
* गोव्यात भाजपची विजय संकल्प रॅली
* कोकणी भाषेत केली आपल्या भाषणाला सुरुवात
* नरेंद्र मोदींची गोव्यात भव्य सभा
* पणजी : नरेंद्र मोदी गोव्यात

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.