नरेंद्र मोदी हे 'एनआरआय' झाले- लालूंचा चिमटा

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 'एनआरआय' झाले, मात्र परदेशात त्यांचा प्रभाव पडलेला दिसत नाही, असा चिमटा बिहारचे माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव यांनी  काढला आहे.

Updated: Nov 18, 2014, 09:48 PM IST
नरेंद्र मोदी हे 'एनआरआय' झाले- लालूंचा चिमटा title=

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 'एनआरआय' झाले, मात्र परदेशात त्यांचा प्रभाव पडलेला दिसत नाही, असा चिमटा बिहारचे माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव यांनी  काढला आहे.

पंतप्रधान मोदी सध्या तीन देशांच्या परदेश दौऱयावर आहेत. मोदींच्या परदेश दौऱ्यावरून लालूप्रसाद यादव यांनी जोरदार हल्ला केला आहे. 

लालू म्हणाले, 'मोदी पंतप्रधान झाल्यापासून देशात थांबतच नाहीत. सतत परदेश दौऱ्यावर जात आहेत. यावरून ते 'एनआरआय' झाल्यासारखे वाटत आहे. परदेशातही त्यांच्या प्रभाव पडलेला दिसत नाही. प्रसारमाध्यमांना सोबत घेऊन मोठा गाजावाजा ते करत आहेत.'

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.