'ती'ची करुण कहाणी, आधी वडील, मग मित्रानंच केला बलात्कार

आपल्या जन्मदात्या बापाकडून होणारे लैंगिक अत्याचार, त्यावर आईचं काहीही न बोलणं... अखेर तिनं हिमतीनं शेजारच्या मुलाला सांगितलं. पण त्यानंही तिचाच फायदा घेतला आणि तिच्यावर बलात्कार केला. अशी 'ती' अल्पवयीन मुलगी मग घर सोडून चक्क दिल्ली मेट्रो स्टेशनवर जावून रडत बसली.  

Updated: Nov 18, 2014, 03:32 PM IST
'ती'ची करुण कहाणी, आधी वडील, मग मित्रानंच केला बलात्कार title=

नवी दिल्ली: आपल्या जन्मदात्या बापाकडून होणारे लैंगिक अत्याचार, त्यावर आईचं काहीही न बोलणं... अखेर तिनं हिमतीनं शेजारच्या मुलाला सांगितलं. पण त्यानंही तिचाच फायदा घेतला आणि तिच्यावर बलात्कार केला. अशी 'ती' अल्पवयीन मुलगी मग घर सोडून चक्क दिल्ली मेट्रो स्टेशनवर जावून रडत बसली.  

दिल्लीतील राजस्थान कॉलनी या भागात राहणारी १५ वर्षाची मुलगी दोन दिवसांपूर्वी दिल्लीतील मेट्रो स्थानकाबाहेर एकटीच बसली होती. पोलिसांनी या मुलीची चौकशी केली असता तिची करुण कहाणी ऐकून पोलिसांनाही धक्का बसला. 

पिडीत मुलगी, इलेक्ट्रीशियनचं काम करणारे वडिल, ह्रदयाच्या आजारानं ग्रासलेली आई आणि भाऊ असे चौघं जण राहतात. पिडीत मुलीचे वडिल मद्यधूंद अवस्थेत तिचं लैंगिक शोषण करायचे. गेल्या वर्षभरापासून हा किळसवाणा प्रकार सुरु होता. पिडीत मुलीनं या प्रकाराची माहिती तिच्या आईला दिली. मात्र आईनंही त्यावर मौन बाळगलं. तर भाऊ हा दररोज कामात व्यस्त असल्यानं तिनं घडलेल्या प्रकाराची माहिती भावाला सांगितली नाही. 

अखेरीस शेजारी राहणाऱ्या एका तरुणाला तिनं वडिलांच्या क्रूरकृत्याची माहिती दिली. त्यानंही तिला धीर देण्याचा दिखावा केला आणि दोन दिवसांपूर्वी तिला दिल्लीतील निर्जनस्थळी नेऊन तिच्यावर बलात्कार केला. या घटनेमुळं पीडित मुलगी मानसिकदृष्ट्या खचली आणि तिनं घर सोडण्याचा निर्णय घेतला. म्हणून दिवसभर मेट्रो स्थानकाबाहेर बसून असल्याचं तिनं पोलिसांना सांगितलं. पोलिसांनी या गंभीर प्रकाराची दखल घेत पीडित मुलीच्या वडिलांना अटक केली आहे. तर तिच्यावर बलात्कार करणारा मित्र पसार झाला आहे. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.