भूसंपादन विधेयकासाठी पुन्हा अध्यादेश नाही, नरेंद्र मोदींची घोषणा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आकाशवाणीवरील 'मन की बात'मधून जनतेशी संवाद साधला. गुजरातमधील हिंसेमुळं देशातील जनता अस्वस्थ असल्याचं मोदी म्हणाले. 

Updated: Aug 30, 2015, 03:52 PM IST
भूसंपादन विधेयकासाठी पुन्हा अध्यादेश नाही, नरेंद्र मोदींची घोषणा  title=

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आकाशवाणीवरील 'मन की बात'मधून जनतेशी संवाद साधला. गुजरातमधील हिंसेमुळं देशातील जनता अस्वस्थ असल्याचं मोदी म्हणाले. 

आणखी वाचा - दिल्लीतील या रोडला एपीजे अब्दुल कलाम यांचे नाव

भूसंपादन विधेयकावरुन गैरसमज पसरवले गेले. शेतकऱ्यांच्या फायद्याच्या अनेक बाबींचा विधेयकात समावेश आहे. उद्या भूसंपादन विधेयकावरील अधिसूचनांची मुदत संपत असल्याची माहिती पंतप्रधानांनी दिली. केंद्र सरकारच्या अनेक योजनांना जनतेनं स्वीकारलंय. 

आणखी वाचा - जनगणना २०११ : सात राज्यात अल्पसंख्यक आहे हिंदू

११ कोटी जनता सुरक्षा योजनेत सहभागी आहे. त्यात ५० टक्के महिलांचा सहभाग आहे. जनधन योजनेत १७ कोटी ७४ लाख नागरिकांची बँक खाती आहे. गरीब जनतेचे २२ कोटी खात्यात असल्याची माहिती पंतप्रधानांनी दिली.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.