पंतप्रधानांचं 'टाईम' मॅनेजमेंट

 पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या परदेश दौऱ्यांमुळे नेहमीच चर्चेमध्ये असतात. मोदी एवढे परदेश दौरे का करतात हा सवाल तर अनेक जण विचारतात.

Updated: Apr 9, 2016, 06:02 PM IST
पंतप्रधानांचं 'टाईम' मॅनेजमेंट title=

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या परदेश दौऱ्यांमुळे नेहमीच चर्चेमध्ये असतात. मोदी एवढे परदेश दौरे का करतात हा सवाल तर अनेक जण विचारतात. पण मोदींच्या परदेश दौऱ्यातल्या टाईम मॅनेजमेंटच्या काही इंटरेस्टिंग गोष्टी आता समोर आल्या आहेत. 

परदेश दौऱ्यावर जाताना वेळ वाचवण्यासाठी पंतप्रधान नेहमी रात्रीच निघतात, आणि विमानामध्ये झोपतात. 

30 मार्च ते 2 एप्रिलपर्यंत नरेंद्र मोदी बेल्जियम, अमेरिका आणि सौदी अरेबियाच्या दौऱ्यावर गेले होते. या दौऱ्यावेळी तीन रात्री मोदींनी एयर इंडियाच्या विमानामध्येच घालवल्या. 

चार दिवसांच्या या दौऱ्यामध्ये मोदींनी 2 रात्री हॉटेलमध्ये घालवल्या, अशी प्रतिक्रिया एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं दिली आहे.