नितीशकुमारांच्या बिहारमध्ये आज मोदींचा ‘हुंकार’!

पंतप्रधान पदासाठी मोदींना कडाडून विरोध करणाऱ्या नितिशकुमारांच्या आखाड्यात अर्थात बिहारमध्ये आज नरेंद्र मोदींची जाहिर सभा होतीये. त्यामुळं मोदींच्या आजच्या हुंकार रॅलीतील भाषणाकडे आणि मोदी नितिशकुमारांवर काय बोलतात याकडे साऱ्या देशाचं लक्ष्य लागलंय.

Aparna Deshpande Aparna Deshpande | Updated: Oct 27, 2013, 08:28 AM IST

www.24taas.com, झी मीडिया, पटना
पंतप्रधान पदासाठी मोदींना कडाडून विरोध करणाऱ्या नितिशकुमारांच्या आखाड्यात अर्थात बिहारमध्ये आज नरेंद्र मोदींची जाहिर सभा होतीये. त्यामुळं मोदींच्या आजच्या हुंकार रॅलीतील भाषणाकडे आणि मोदी नितिशकुमारांवर काय बोलतात याकडे साऱ्या देशाचं लक्ष्य लागलंय.
‘हुंकार रॅली`मधील भाषणाला पक्षानं उच्च तंत्रज्ञानाची जोड दिली आहे. शिवाय यासाठी तीन हजार बसेसचा ताफा आणि अकरा ट्रेन बुक करण्यात आल्यात. या भव्यदिव्य मेळाव्याला ज्यांना उपस्थित रहाता येणार नाही अशा लोकांना मोदींचं भाषण मोबाईलवरून ऐकता येणार आहे.
मोदी यांचा बिहारमधील हा पहिलाच राजकीय मेळावा आहे आणि २०१४मधील लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वाभूमीवर तो ऐतिहासिक आणि महत्त्वाचा असेल.
दरम्यान, नरेंद्र मोदींचे पोस्टर्स आणि बॅनर बिहार सरकारनं काढून टाकले आहेत.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.