www.24taas.com, अहमदाबाद
गुजरातमधल्या नरोडा पाटिया हत्याकांड प्रकरणी भाजपच्या विद्यमान आमदार आणि माजी मंत्री माया कोडनानी यांच्यासह 32 जणांना दोषी ठरवण्यात आलंय. दोषींमध्ये बजरंग दलाच्या बाबू बजरंगी याचाही समावेश आहे.
गोध्रा हत्याकांडानंतर नरोडा पाटियामध्ये विश्व हिंदू परिषदेनं बंद पुकारला होता. त्यावेळी झालेल्या हत्याकांडात 97 जणांची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणात 62 आरोपी होते. त्यापैकी तिघांचा सुनावणीदरम्यान मृत्यू झाला. तर इतरांची जामिनावर सुटका झाली. आत्तापर्य़ंत या खटल्यात 327 जणांची साक्ष घेण्यात आली.
माया कोडनानी यांना दोषी ठरवल्यामुळं हा नरेंद्र मोदी सरकारला मोठा धक्का मानला जातोय. अहमदाबादच्या विशेष कोर्टानं हा निर्णय दिलाय.