नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या मृत्यूचं गूढ उलगडणार

आज नेताजींबाबतचे गूढ उलगडण्याची शक्यता आहे. नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्याशी संबंधीत 100 गोपनीय फाईल्स आज नेताजींच्या जयंतीला सार्वजनिक करण्यात येणार आहेत.

Updated: Jan 23, 2016, 09:15 AM IST
नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या मृत्यूचं गूढ उलगडणार title=

नवी दिल्ली : आज नेताजींबाबतचे गूढ उलगडण्याची शक्यता आहे. नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्याशी संबंधीत 100 गोपनीय फाईल्स आज नेताजींच्या जयंतीला सार्वजनिक करण्यात येणार आहेत.

पंतप्रधन नरेंद्र मोदींच्या हस्ते या फाईल्स सार्वजनीक करण्यात येतील. पंतप्रधान नरेद्र मोदी यांनी मागील वर्षी ऑक्टोबरमध्ये नेताजींच्या नातेवाईकांशी भेट घेतली होती. त्यानंतर त्यांनी या फाईल्स सार्वजनीक करण्याचं सांगितलं होतं.