ओबीसीमध्ये आणखी १५ जातींचा समावेश

देशातल्या आणखी पंधरा जातींचा ओबीसीत समावेश करण्यात आलाय. यात महाराष्ट्र आणि जम्मू-काश्मिरमधल्या काही जातींना स्थान देण्यात आलंय. 

Updated: Nov 30, 2016, 10:57 PM IST
ओबीसीमध्ये आणखी १५ जातींचा समावेश

नवी दिल्ली : देशातल्या आणखी पंधरा जातींचा ओबीसीत समावेश करण्यात आलाय. यात महाराष्ट्र आणि जम्मू-काश्मिरमधल्या काही जातींना स्थान देण्यात आलंय. 

 केंद्रीय मंत्रिमंडळानं या प्रस्तावाला मंजुरी दिल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. त्यामुळं आता या दोन्ही राज्यांमधील समावेश कऱण्यात आलेल्या जातींना ओबीसीचा लाभ मिळणार आहे.  
 
 त्याचवेळी पाकव्याप्त काश्मीरमधल्या निर्वासितांकरता, केंद्र सरकारनं दोन हजार कोटींचं आर्थिक सहाय्य मंजूर केलं आहे. पाकव्याप्त काश्मीरमधली छत्तीस हजाराहून जास्त कुटुंब विस्थापीत झाली आहेत. 

About the Author