पी. सत्यसिवम नवे सरन्यायाधीश

भारताचे ४० वे सरन्यायाधीश म्हणून पी. सत्यसिवम यांनी शपथ घेतली. राष्ट्रपतीभवनातल्या दरबार हॉलमध्ये राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी त्यांना शपथ दिली.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Jul 19, 2013, 02:02 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
भारताचे ४० वे सरन्यायाधीश म्हणून पी. सत्यसिवम यांनी शपथ घेतली. राष्ट्रपतीभवनातल्या दरबार हॉलमध्ये राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी त्यांना शपथ दिली.
यावेळी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यासह सोनिया गांधी, उपराष्ट्रपती हमीद अन्सारी, लोकसभेतल्या विरोधी पक्षनेत्या सुषमा स्वराज, अरुण जेटली, लालकृष्ण अडवाणी उपस्थित होते. पी. सत्यसिवम हे सुप्रीम कोर्टात २००७ पासून न्यायाधीश म्हणून कार्यरत आहेत.

२७ एप्रिल १९४९ मध्ये जन्म झालेले सत्यसिवम यांनी १९७३ मध्ये मद्रासमध्ये वकीलीच्या कारकिर्दीला सुरुवात केली. १९९६मध्ये ते मद्रास हायकोर्टाचे न्यायाधीश झाले.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.