गोव्यात पुन्हा संघाची डोकेदुखी, बेहेरे यांनीही वेलिंगकरांचीच री ओढली

 गोव्याचे माजी संघचालक सुभाष वेलिंगकरांनी भाजपविरोधात बंड पुकारलंय. मात्र, वेलिंगकरांच्या जागी आलेल्या लक्ष्मण बेहेरे यांनीही वेलिंगकरांचीच री ओढली आहे.

Updated: Sep 13, 2016, 04:24 PM IST
गोव्यात पुन्हा संघाची डोकेदुखी, बेहेरे यांनीही वेलिंगकरांचीच री ओढली title=

पणजी :  गोव्याचे माजी संघचालक सुभाष वेलिंगकरांनी भाजपविरोधात बंड पुकारलंय. मात्र, वेलिंगकरांच्या जागी आलेल्या लक्ष्मण बेहेरे यांनीही वेलिंगकरांचीच री ओढली आहे.

मातृभाषेतून शिक्षणाच्या मुद्द्यावर वेलिंगकरांनी बंडाचा झेंडा उभारला आहे. नवनियुक्त संघचालक बेहेरेंनीही याच मुद्द्यावरून संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकरांवर टीका केली आहे. पर्रिकर यशस्वी राजकारणी आहेत, म्हणूनच ते संरक्षण मंत्री आहेत. मात्र गोव्याचे मुख्यमंत्री असताना माध्यमाचा मुद्दा व्यवस्थित हाताळला नाही, असे बेहेरेंनी म्हटले आहे. 

शिक्षणाचे माध्यम हे मातृभाषाच असावं, ही सर्वसामान्यांची भावना आहे आणि संघाचा या मागणीला पाठिंबा आहे, असेही बेहेरे यांनी म्हटले आहे. दरम्यान वेलिंगकरांना भारतीय भाषा संरक्षण मंचाचं काम आणखी जोमाने करता यावं यासाठी संघचालक पदाच्या जबाबदारीतून मुक्त केल्याचंही बेहेरे यांनी सांगितले.