नवी दिल्ली : सरकार नव्या वर्षात एक रुपयांची नोट जारी करणार आहे. सध्या एक रुपयांच्या नोटांची छपाई बंद आहे. एका वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार एक रुपयाची नवीन नोट तयार केली जात आहे.
अर्थ मंत्रालयाने कॉयनेज अॅक्ट २०११मध्ये बदल केला असून यानंतर एक जानेवारीपासून नवीन एक रुपयांची नोट छापण्याचा सरकारला अधिकार मिळाला आहे. याची छपाई सरकारी प्रिंटींग प्रेसमध्ये होणार आहे. ही नोट गुलाबी आणि हिरव्या रंगात असते. त्यावर रुपयाचे नवीन चिन्हही असेल. यावर वित्त सचिव राजीव महर्षी यांचे हस्ताक्षर असतील. हे हिंदी आणि इंग्रजी या दोन्ही भाषांमध्ये असतील.
सरकार छोट्या किंमतीचे नोट छापण्यापासून स्वतःला दूर ठेवते. या खर्च अधिक आणि मूल्य खूप कमी असते. तसेच कागदाच्या नोटांचे लाइफ कमी असते आणि त्या लवकरच खराब होतात.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.