'नथुराम गोडसे मंदिर' बांधणाऱ्यावर गुन्हा दाखल

मेरठमध्ये नथुराम गोडसे मंदिर प्रकरणात अखिल भारतीय हिंदू महासभेचे महामंत्री मदन शर्मा यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय.

Updated: Dec 26, 2014, 12:55 PM IST
'नथुराम गोडसे मंदिर' बांधणाऱ्यावर गुन्हा दाखल title=

मेरठ : मेरठमध्ये नथुराम गोडसे मंदिर प्रकरणात अखिल भारतीय हिंदू महासभेचे महामंत्री मदन शर्मा यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय.

महात्मा गांधीजींचा अपमान केल्याचा गुन्हा त्यांच्यावर ठेवण्यात आलाय. या प्रकरणाचा तपास करुन योग्य कारवाई केली जाईल, असं आश्वासन मेरठ पोलिसांनी दिलंय.

गेल्या बुधवारी महात्मा गांधींचा खून करणा-या नथुराम गोडसेचे मंदीर बांधण्यासाठी अखिल भारतीय हिंदू महासभेने मीरतमध्ये भूमीपूजन करण्यात आलं. यावेळी पार पडलेल्या कार्यक्रमात मदन शर्मा यांनी गांधीजींविरोधात अपशब्द वापरल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. मीरतमधल्या शारदा रोडवर प्रस्तावित मंदीर होणार आहे.

याअगोदर, महात्मा गांधी यांची हत्या करणारा नथुराम गोडसे हा देशभक्त होता, असं वक्तव्य भाजपा खासदार साक्षी महाराज यांनी वाद ओढवून घेतला होता. 

 

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.