झी न्यूजच्या शिरपेचात मानाचे प्रतिष्ठीत पाच पुरस्कार

झी न्यूजच्या यशाचा ध्वज पुन्हा एकदा फडकला आहे. झी न्यूजला मानाचे पाच पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे. टेलिव्हीजन न्यूजमधील सर्वात प्रतिष्ठेचा NT पुरस्कार झी न्यूजच्या ऑनलाईन वेबसाईट zeenews.com ला बेस्ट न्यूज चॅनेल वेबसाईटचा पुरस्कार मिळाला आहे.

Updated: Jun 30, 2016, 02:55 PM IST
झी न्यूजच्या शिरपेचात मानाचे प्रतिष्ठीत पाच पुरस्कार title=

Zee Newsला मिळालेत News Televisionचे पाच पुरस्कार

नवी दिल्ली : झी न्यूजच्या यशाचा ध्वज पुन्हा एकदा फडकला आहे. झी न्यूजला मानाचे पाच पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे. टेलिव्हीजन न्यूजमधील सर्वात प्रतिष्ठेचा NT पुरस्कार झी न्यूजच्या ऑनलाईन वेबसाईट zeenews.com ला बेस्ट न्यूज चॅनेल वेबसाईटचा पुरस्कार मिळाला आहे.

zeenews.com अचूक आणि विश्वासार्ह बातम्या देणारी वेबसाईट वाचकांमध्ये अधिक लोकप्रिय आहे. हा पुरस्कार वाचकांचे प्रेम आणि त्यांचा विश्वास याचेच एक प्रतिक आहे. झी न्यूज डॉट कॉम इंग्रजी, हिंदी याशिवाय अन्य प्रादेशिक भाषेत बातम्या देत आहेत. झी न्यूज डॉट कॉमच्या अंतर्गत मराठी, बंगाली, पंजाबी, मल्यालम, तेलगू आदी प्रादेशिक भाषेत वेबसाईट आहेत.

मिळालेले प्रतिष्ठीत पुरस्कार

१. डीएनएला बेस्ट न्यूज शोचा एनटी पुरस्कार
२. झी न्यूजला बेस्ट प्रोमो कॅंपेनचा एनटी पुरस्कार
३. झी न्यूजला बेस्ट ग्राफिक्सचा एनटी पुरस्कार
४. झी न्यूजला बेस्ट न्यूज चॅनेल वेबसाईटचा पुस्कार
५. बेस्ट डेली न्यूज शोसाठी DNAला एनटी पुरस्कार