'इंडियाज डॉटर' फेक डॉक्युमेंट्री निर्भयाच्या पीडित मित्राचा खुलासा

दिल्लीतील निर्भया बलात्कार प्रकरणावर बीबीसीनं तयार केलेल्या डॉक्युमेंट्रीच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झालंय. घटनेचा साक्षीदार आणि निर्भयाचा मित्र अरविंद पांडे याने ही डॉक्युमेंट्री खोटी असल्याचं म्हटलंय.

Updated: Mar 11, 2015, 02:27 PM IST
'इंडियाज डॉटर' फेक डॉक्युमेंट्री निर्भयाच्या पीडित मित्राचा खुलासा title=

नवी दिल्ली: दिल्लीतील निर्भया बलात्कार प्रकरणावर बीबीसीनं तयार केलेल्या डॉक्युमेंट्रीच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झालंय. घटनेचा साक्षीदार आणि निर्भयाचा मित्र अरविंद पांडे याने ही डॉक्युमेंट्री खोटी असल्याचं म्हटलंय.

एका इंग्रजी न्यूज चॅनेलला दिलेल्या इंटरव्ह्यूमध्ये अरविंदने सांगितलं की, ही डॉक्युमेंट्री खोटी आणि असंवेदनशील आहे. या संपूर्ण डॉक्युमेंट्रीमध्ये पीडिताला काय वाटतं हे दुर्लक्षित केलं गेलंय. त्या रात्री नेमकं काय घडलं ते फक्त मला आणि निर्भयालाच माहिती होतं आणि ते सत्य डॉक्युमेंट्री पेक्षा खूप वेगळं आहे.

डॉक्युमेंट्रीमध्ये निर्भयाच्या ज्या ट्युटरला वारंवार दाखवलं गेलंय, त्यावर प्रश्न उपस्थित करत अरविंद म्हणाला, त्याला कसं माहित की, मला त्या रात्री कोणता सिनेमा पाहायचा होता ते. आणि मी कधीही निर्भयाच्या ट्युटर सतेंद्रबद्दल ऐकलं नाही. 

उडवीनच्या या डॉक्युमेंट्रीवर भारत सरकारनं बॅन लावलाय. तसंच इंटरनेट, य्-ट्युबवरील व्हिडिओवरही बंदी घातलीय. या बंदीचा विरोध अनेक जण आपआपल्या पद्धतीनं करत आहेत. पण खरोखर जो पीडित होता त्यानंच या डॉक्युमेंट्रीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केल्यामुळे आता डॉक्युमेंट्रीवर विश्वास ठेवायचा की नाही, असा प्रश्न निर्माण झालाय. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.