नवी दिल्ली : केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या घरामध्ये होत असलेल्या कथित हेरगिरीचा मुद्दा सोमवारी चांगलाच गाजला. दिल्लीतल्या तीन मूर्ती लेनवर असलेल्या गडकरींच्या निवासस्थानी हेरगिरीची उपकरणं सापडल्याचं वृत्त पसरलं होतं. मात्र, गडकरींनी याचा स्पष्ट शब्दात इनकार केलाय. याबाबत त्यांनी तसे ट्वीट केलेय. अशी कोणतीही हेरगिरी झालेली नाही.
नितीन गडकरी यांच्या या प्रकरणामुळे दिल्लीच्या राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ माजली. मात्र स्वतः गडकरींनी ट्वीटरवरून याचा इन्कार केला. आपल्या घरात अशी कुठलीही उपकरणं सापडली नसल्याचं ते म्हणाले. दुसरीक़डे केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग आणि पक्षाध्यक्ष अमित शहा यांनी या प्रकरणी बोलण्यास नकार दिला.
गडकरींनी स्वतःच याचा खुलासा केला असल्यामुळे त्यावर बोलणं योग्य नाही, असं राजनाथ सिंग म्हणाले. काँग्रेस तसंच डाव्या पक्षांनी मात्र या प्रकरणी सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनीही या विषयी तपास व्हायला हवा, असं म्हटलंय.
गडकरींचे ट्वीट ...
माझ्या घरात कुठेही अशी उपकरणं सापडलेली नाहीत. मी यापूर्वीच ही बाब स्पष्ट केली आहे. हेरगिरी झाली नाही.
गडकरी हेरगिरी प्रकरणी केद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग आणि पक्षाचे अध्यक्ष अमित शहांचा बोलण्यास नकार !
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.