कोलकाता : केंद्रीय मंत्री नितिन गडकरी आज एका हेलिकॉफ्टर अपघातातून थोडक्यात बचावलेत. पश्चिम बंगालमध्ये हल्दिया या गावी एका कार्यक्रमासाठी ते चालले होते.
हेलिकॉप्टर घटनास्थळी पोहोचताच त्याठिकाणी जमिनीवर अंथरलेल्या चटया हेलिकॉफ्टरच्या पंख्यामुळे हवेत उडू लागल्या. या चटया पंख्याच्या संपर्कात आल्या असत्या तर अपघात झाला असता.
हेलिकॉप्टर खाली उतरताना ही घटना घडली. पायलटने प्रसंगावधान राखून हेलिकॉफ्टर सुरक्षित ठिकाणी उतरलं ज्यामुळे फार मोठा अनर्थ टळला.
या घटनेनंतर लगेचच नितिन गडकरींनी आपण आणि हेलिकॉफ्टरमधील सारे सुखरूप असल्याची माहिती ट्विटरवरून दिली.
'हल्दियासाठी आपल्यासोबत असलेले सारे प्रवासी सुखरूप आहेत, आपल्या काळजी आणि शुभेच्छांसाठी धन्यवाद' असे त्यांनी ट्विटमध्ये म्हटलंय.
All passengers on board helicopter to Haldia are safe. Really appreciate the concerns and well wishes expressed
— Nitin Gadkari (@nitin_gadkari) June 24, 2015
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.