पाटणा : जेडीयूचे सरकारमधील महसूल मंत्री अवधेश प्रसाद कुशवाह यांनी लाच घेतल्याचा व्हिडीओ सोशल नेटवर्किंगवर व्हायरल झाला.
यानंतर खुशवाह सिंह यांचा राजीनामा घेण्यात आला असून, त्यांना पक्षाकडून निवडणूक लढवण्यासाठी मनाई करण्यात आली आहे.
ऐन निवडणुकीत हा व्हिडीओ समोर आल्याने जेडीयूची अडचण झाली आहे. हा व्हिडीओ किती सत्य आहे हे अजून पडताळून पाहण्यात आलेलं नाही.
कारण हा व्हिडीओ सोशल नेटवर्किंगवर फिरत असल्याने याची जबाबदारी अजून कुणीही घेतलेली नाही.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.