तिरुअनंतपुरम : शनिशिंगणापूरमध्ये शनिच्या मंदिरात महिलांच्या प्रवेशावरुन महाराष्ट्रात वाद सुरु असतानाच केरळ राज्यात मात्र शबरीमाला मंदिरातील महिला प्रवेशांच्या बंदीला केरळ सरकारने समर्थन दिलंय.
मासिक पाळी सुरु असलेल्या महिलांना शबरीमाला मंदिरात प्रवेश देण्याचा निर्णय धर्माशी संबंधीत आहे, असं प्रतिज्ञापत्रच केरळ सरकारने सर्वोच्च न्यायालयात सादर केलं आहे.
असे प्रतिज्ञापत्र सादर करुन शबरीमाला मंदिरामध्ये महिलांना असलेल्या प्रवेशबंदीला केरळ सरकारने एक प्रकारे समर्थनच दिलंय.