`पैसा काही झा़डाला लागत नाही`, पंतप्रधानाचा देशाला संदेश

पैसा काही झाडाला लागत नाही`. असं म्हणतं. पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी भारतीय अर्थव्यवस्थेचे अक्षरश: धि़ंडवडेच काढले. सामान्यांवर भार टाकायचा नाही मात्र आर्थिक मंदीमुळे हे कठोर निर्णय घ्यावे लागतात.

Updated: Sep 21, 2012, 09:09 PM IST

www.24taas.com, नवी दिल्ली
`पैसा काही झाडाला लागत नाही`. असं म्हणतं. पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी भारतीय अर्थव्यवस्थेचे अक्षरश: धि़ंडवडेच काढले. सामान्यांवर भार टाकायचा नाही मात्र आर्थिक मंदीमुळे हे कठोर निर्णय घ्यावे लागतात. देशाला उद्देशून केलेल्या भाषणातून त्यांनी संदेश दिला. `FDIमुळे छोट्या व्यापाऱ्यांचे नुकसान होणार नाही.`
`डिझेल १७ रूपयांनी वाढवायचं होतं मात्र सामान्यांवर भार नको म्हणून ५ रूपयांनीच भाव वाढवले.` `दरवाढ आवश्यक, नाहीतर सबसिडी बोजा,` कठोर पावलं उचलण्याची वेळ आलेली आहे.` `देश आर्थिक संकटात आहे देशाला कठोर आर्थिक निर्णयाची घेण्याची गरज होती.` `सरकार सामान्य जनतेवर आर्थिक भार टाकू इच्छित नाही`. असं सांगून सरकार किती प्रयत्नशील आहे हे पटवून देण्याचा प्रयत्न पंतप्रधानांनी केला.
युरोपात ओढवलेली आर्थिक परिस्थीती भयावह आहे. तसे आर्थिक संकट देशावर येऊ द्यायचे नसेल तर कोठोर आर्थिक निर्णय घेतले पाहिजे, असे सांगत पंतप्रधान मनमोहनसिंग यांनी डिझेल दरवाढ आणि रिटेलमधील विदेशी गुंतवणूकीचा निर्णय घेणे गरजेचे असल्याचे म्हटले आहे.