www.24taas.com, मुंबई
कॅश रिझर्व्ह रेशो (सीआरआर) आणि रेपो रेटमध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया काहीतरी बदल करून बाजाराला खुशखबर देणार, अशी आशा असताना आरबीआयनं मात्र सीआरआर आणि रेपो रेटमध्ये काहीही बदल केलेले नाहीत त्यामुळे गुंतवणूकदारांची मात्र निराशा झालीय. पण, जानेवारीमध्ये मात्र यामध्ये काही बदल केले जातील, अशी आशा आरबीआयनं व्यक्त केलीय.
मंगळवारी आरबीआयनं आर्थिक धोरण जाहीर केलं. यावेळी आरबीआयनं ही घोषणा केलीय. रेपो रेटमध्ये (बँकांना पैसे उसने देण्याचा दर) बदल झालेला नाही त्यामुळे तो आत्ताही ८ टक्के इतका आहे तर रिवर्स रेपो रेट ७ टक्क्यांवर स्थिर राहिलाय. तर सध्या कॅश रिझर्व्ह रेशो ४.२ टक्क्यांवर स्थिरावलाय. साहजिकच, कर्जधारकांच्या ईएमआयवर देखील काहीही फरक पडणार नाही.
आरबीआयच्या या घोषणेनंतर बाजारातील उत्साह थोडा का होईना पण कमी झालाय. येत्या २९ जानेवारी रोजी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आपलं तिमाही धोरण जाहीर करणार आहे.