महिलांना ‘डीजे’वर नाचण्यास मनाई

जिथं एकीकडे महिला प्रगतीपथावर पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करतायेत. तिथं काही महिलांवर आजही अनेक निर्बंध लादले जात आहेत.

Updated: Jun 30, 2014, 11:25 AM IST
महिलांना ‘डीजे’वर नाचण्यास मनाई title=

हरियाणा: जिथं एकीकडे महिला प्रगतीपथावर पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करतायेत. तिथं काही महिलांवर आजही अनेक निर्बंध लादले जात आहेत.

आता हरियाणातील अग्रवाल समाजाच्या महिला लग्नसमारंभामध्ये डीजेवर डांस करून शकणार नाहीत, त्यांच्या नाचण्यावर बंदी घालण्यात आलीय. असा फतवाच अखिल भारतीय अग्रवाल संमेलनात काढण्यात आलाय.

जींदच्या जाट धर्मशाळा इथं बोलावण्यात आलेल्या या संमेलनात तसा प्रस्तावच पास करण्यात आलाय. जर कोणी याचं पालन नाही केलं त्यांना दंड ठोठावण्याचा निर्णयही आहे.

कार्यक्रमात भ्रूण हत्या, हुंडा प्रथा नष्ट करणं, गोवंश वाचवणं आणि समाज एकत्र करून समाजातील वाईट प्रवृत्ती नष्ट करण्याचा प्रस्तावही पास करण्यात आलाय. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.