विना अनुदानीत सिलेंडर १०.५० रूपयांनी महागला

 जागतिक स्तरावर कच्च्या तेलाच्या किंमतीत वाढ झाल्यामुळे घरगुती बाजारात सरकारी तेल कंपन्यांनी विमान इंधनाच्या दरात ७.५ टक्के वाढ केली तर विना अनुदानीत स्वयंपाकाच्या गॅस सिलेंडरच्या भावात १०.५० रुपये वाढ केली आहे. 

Updated: Jun 1, 2015, 05:26 PM IST
विना अनुदानीत सिलेंडर १०.५० रूपयांनी महागला

नवी दिल्ली :  जागतिक स्तरावर कच्च्या तेलाच्या किंमतीत वाढ झाल्यामुळे घरगुती बाजारात सरकारी तेल कंपन्यांनी विमान इंधनाच्या दरात ७.५ टक्के वाढ केली तर विना अनुदानीत स्वयंपाकाच्या गॅस सिलेंडरच्या भावात १०.५० रुपये वाढ केली आहे. 

विमान इंधन (एटीएफ)चा भावात ३७४४.०८ रुपयांनी वाढ झाल्याने प्रति किलोलीटर भाव ५३,३५३.९२ रूपये झाला आहे. यापूर्वी एक मे रोजी भाव २७२ रूपये प्रति किलोलीटर म्हणजेच ०.५ टक्के वाढून ५०,६०९.८४ करण्यात आला होता. 

जागतिक पेट्रोलियम बाजारातील ट्रेड पाहता विना अनुदानीत गॅसच्या किंमतीत १०.५० रूपये वाढ करण्यात आली आहे. यापूर्वी १४.२ किलो वजनाच्या सिलेंडरची किंमत दिल्लीत ६२६.५० करण्यात आली आहे. यापूर्वी ती ६१६ रूपये होती. यापूर्वी एक मे रोजी सिलेंडरच्या दरात पाच रुपये कपात करण्यात आली होती. 

प्रत्येक ग्राहकाला १४.२ किलोचे १२ आणि पाच किलोचे ३४ सिलेंडरला अनुदान मिळते. याची दिल्लीतील किंमत ४१७ रुपये आणि १५५ रूपये किंमत आहे. या व्यतिरिक्त आवश्यकता असल्यास ग्राहकाला आता ६२६.५० रुपये देऊन अतिरिक्त सिलेंडर घ्यावा लागेल. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.