मुफ्ती मोहम्मद सईद यांनी घेतली पंतप्रधान मोदींची भेट

 जम्मू काश्मीरमध्ये पीडीपी आणि भाजपचं सरकार स्थापनेला दोनच दिवस असताना पीडीपीच्या मुफ्ती मोहम्मद सईद यांनी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतलीय. मात्र, चर्चेचा तपशील मिळू शकलेलना नाही.

PTI | Updated: Feb 27, 2015, 02:34 PM IST
मुफ्ती मोहम्मद सईद यांनी घेतली पंतप्रधान मोदींची भेट  title=

नवी दिल्ली :  जम्मू काश्मीरमध्ये पीडीपी आणि भाजपचं सरकार स्थापनेला दोनच दिवस असताना पीडीपीच्या मुफ्ती मोहम्मद सईद यांनी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतलीय. मात्र, चर्चेचा तपशील मिळू शकलेलना नाही.

काश्मीरमध्ये भाजपच्या सहय्यानं पीडीपी सरकार स्थापन करणार असून १ मार्चला शपथविधी सोहळा आहे. पीडीपीचे मुफ्ती मोहम्मद सईद मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. जम्मू-काश्मीरमध्ये सत्ता स्थापन करण्यासाठी दोन्ही पक्षांत बरीच चर्चा झाली.

पीडीपी आणि भाजपमध्ये वाटाघाटी होण्यात तब्बल २ महिन्याचा कालावधी लागला आणि अखेर १ मार्चला नव्या सरकारचा शपथविधी होतोय. सरकार स्थापनेपूर्वी मुफ्ती-मोदी यांची आजची ही भेट अत्यंत महत्त्वाची आहे.शपथविधी सोहळ्यात भाजपचे बारा आणि पीडीपीचे तेरा मंत्री शपथ घेणार आहेत..तर पंतप्रधान मोदी या शपथविधी सोहळ्याला हजर राहणार आहेत.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.