www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
सीबीआयचे संचालक रंजीत सिन्हा यांच्या ‘बलात्कार’ विषयीच्या मतांनी चांगलाच वादंग निर्माण केलाय. ‘बलात्कार रोखू शकत नसाल तर त्याचा आनंद घ्या’ असं वक्तव्य रंजीत सिन्हा यांनी एका पत्रकार परिषदेत केलंय.
सिन्हा यांनी सट्टेबाजीची तुलना बलात्कारासोबत केलीच पण, जर बलात्कार रोखता येणं शक्य नसेल अशा वेळेस त्याचा आनंद घेण्याचा सल्लाही त्यांनी दिलाय. सिन्हा यांच्यासारख्या वरीष्ठ पदावरील व्यक्तीनं अशी वक्तव्य केल्यानं अनेकांनी नाराजी व्यक्त केलीय.
सिन्हा यांच्या या वक्तव्यावर अनेकांनी टीका केलीय. माजी आयपीएस अधिकारी किरण बेदी यांनी ‘रंजीत सिन्हा यांचं हे वक्तव्य कोणत्याही पद्धतीनं स्वीकारण्या योग्य नाही’ असं सांगत ‘सिन्हासारख्या वरीष्ठ पदावरील व्यक्ती एवढ्या सहजरित्या असा घृणास्पद वक्तव्य करूच कसं शकतात’ असा प्रश्नही विचारलाय.
तर, सामाजिक कार्यकर्ता कविता कृष्ण यांच्या अशा वक्तव्यांसाठी रंजीत सिन्हा यांच्यावर कारवाई होऊन त्यांना शिक्षा मिळायला हवी, अशी मागणी केलीय. देशाच्या उच्च पदावरील बलात्काराला अशा पद्धतीनं हास्यामध्ये उडवून लावत असंल तर तो व्यक्ती एखाद्या प्रकरणाची चौकशी किती संवेदनशील पद्धतीनं करू शकेल? असं म्हणत सिन्हा यांच्या कार्यपद्धतीवरही त्यांनी शंका उपस्थित केलीय. भाजप नेत्या स्मृती इराणी यांनीदेखील रंजीत सिन्हा यांच्या या वक्तव्यावर टीका केलीय.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.