नवी दिल्ली : रेल्वे थांबवण्यासाठी साखळी ओढा अशी सूचना, तुम्ही रेल्वेच्या डब्यात लिहलेल्या पाहिल्या असतील. मात्र या साखळीपासून लवकरच सुटका मिळणार आहे, रेल्वे या सर्व साखळ्या काढणार आहे, काही गाड्यांच्या साखळ्या काढण्याचं काम सुरू आहे.
कारण नसतांना साखळी ओढण्याचं प्रमाण सर्वाधिक आहे, यामुळे रेल्वेला जवळजवळ ३ हजार कोटी रूपयांचा फटका बसल्याचं एका अधिकाऱ्याने म्हटलं आहे. यावरून ही साखळी काढून घेणे सुरू आहे.
यापुढे रेल्वेच्या मोटरमनचा मोबाईल नंबर प्रत्येक डब्यात लिहिला जाणार आहे, यामुळे कारण नसतांना साखळी खेचण्याचे प्रकार थांबणार आहेत. यामुळे रेल्वेला उशीर होण्याचे प्रकारही मोठ्या प्रमाणात कमी होणार असल्याचं एका अधिकाऱ्याने सांगितलं.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.