Good News ! आजपासून रेल्वे प्रवासात तिकीट मिळणार कंन्फर्म

रेल्वे प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी. आजपासून रेल्वेमध्ये प्रवाशांना तिकीट उपलब्ध होणार आहे. तेही कन्फर्म. ही सुविधा पहिल्या सत्रात सुपर फास्ट रेल्वेत मिळणार नाही. 

Updated: Sep 29, 2015, 03:46 PM IST
Good News ! आजपासून रेल्वे प्रवासात तिकीट मिळणार कंन्फर्म   title=

नवी दिल्ली : रेल्वे प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी. आजपासून रेल्वेमध्ये प्रवाशांना तिकीट उपलब्ध होणार आहे. तेही कन्फर्म. ही सुविधा पहिल्या सत्रात सुपर फास्ट रेल्वेत मिळणार नाही. 

यात लखनऊ मेल, गरीब रथ, अर्चना सुपरफास्ट या गाड्यांचा समावेश आहे. तसेच याशिवाय काही अन्य गाड्यांचा समावेश असणार आहे. आता रेल्वेमध्ये टीसीकडे एक हॅंड हेल्डिंग मशीन असेल. ही मशीन प्रवासी आरक्षण सिस्टमच्या सर्व्हरला जोडलेली असेल.

तुम्ही प्रवास करताना काही कारणामुळे तिकीट काढू शकला नसाल तर तुम्ही थेट टीसीकडे संपर्क साधायचा. त्याला सांगायचे माझ्याकडे तिकीट नाही. त्याच्याकडून तिकीट घ्यायचे. मात्र, तुम्हाला अधिकचे दहा रुपये मोजावे लागणार आहेत. ही सुविधा घेणाऱ्या प्रवाशांनी रेल्वेत चढण्याआधी टीसीला सांगयचे की तिकीट काढलेले नाही.

याआधी ही सुविधा उपलब्ध होती. आधी गार्डद्वारे सर्फिकेट मिळाल्यानंतर रेल्वेत टीसीकडून तिकीट घेतले जात होते. आता नविन सिस्टमनुसार टीसीकडे मशीन देण्यात आली आहे. ही मशीन सर्व्हरला जोडलेली असल्याने याचा लाभ प्रवाशांना मिळणार आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*   झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.