आता एका क्लिकवर आपल्या गॅस सिलेंडरचे पैसे भरा

नवी दिल्ली : घरात एलपीजी गॅस सिलेंडर वापरणाऱ्या ग्राहकांना मोदी सरकारने एक आनंदाची बातमी दिली आहे.

Updated: Jan 25, 2016, 12:04 PM IST
आता एका क्लिकवर आपल्या गॅस सिलेंडरचे पैसे भरा title=
नवी दिल्ली : घरात एलपीजी गॅस सिलेंडर वापरणाऱ्या ग्राहकांना मोदी सरकारने एक आनंदाची बातमी दिली आहे. आता तुम्हाला तुमचा गॅस सिलेंडरचे पैसे ऑनलाईनही भरता येणार आहेत.
केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी रविवारी या योजनेचा शुभारंभ केला. मंत्र्यांनी यानंतर केलेल्या ट्वीटमध्ये ग्राहकांना सुविधा देण्यासाठी तसेच कामात पारदर्शकता आणण्यासाठी ही योजना सुरु केल्याचे म्हटले आहे.
'डिजीटल इंडिया'चा भाग म्हणून आता जास्तीत जास्त ग्राहकांना ऑनलाईन सेवा देण्याचा सरकारचा मानस आहे.

या नव्या सेवेमुळे ग्राहकांना सिलेंडर ऑनलाईन खरेदी करण्यासोबतच ऑनलाईन पैसे भरण्याची सोयही करण्यात आली आहे. यामुळे दर वेळी सुट्टे पैसे शोधण्याचा त्रासही वाचणार आहे.