www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
आता आपण देशातल्या कोणत्याही बँकेच्या शाखेत जावून २००५ पूर्वीच्या नोटा (५०० आणि १००० सह) बदलू शकता. १ जानेवारी २०१५पर्यंत ही सेवा उपलब्ध आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेनं सर्व बँकांना तसे आदेश दिले आहेत की सामान्य नागरिकांची जुन्या नोटांपासून सुटका होण्यासाठी त्यांची मदत करा. विशेष म्हणजे नोट बदलण्याच्या संख्येची कोणतीही सीमा नाहीय.
रिझर्व्ह बँकेनं २००५ पूर्वीच्या नोटा बाजारातून वापस घेण्याचा निर्णय घेतलाय. अशा नोटा ज्यांच्याजवळ असतील त्यांनी त्या १ जानेवारी २०१५ पर्यंत बदलून घ्यायच्या आहेत. पहिले ही सीमा ३० जूनपर्यंत होती. ज्यांना ५००, १०००च्या १० नोटांपेक्षा जास्त नोट बदलून घ्यायच्या असतील त्यांना ओळखपत्र देणं बंधनकारक असेल.
नुकतंच सामान्य प्रश्नांमध्ये (एफएक्यू ) रिझर्व्ह बँकेनं सांगितलं की, "सर्व बँकांना आदेश दिले सामान्य नागरिकांना नोट बदलण्याची सुविधा उपलब्ध करून द्या, जरी तो व्यक्ती तुमचा ग्राहक नसेल तरी". सोबतच किती नोट बदलायच्या आहेत याची काही सीमान नाही. बँकांना असे आदेश देण्यात आलेत की, कोणत्याही प्रकारची द्विधावस्था न होऊ देता या नोटा बदलण्याचं काम करा. या दरम्यान कॅश काऊंटरवर आणि एटीएमद्वारे २००५ पूर्वीच्या नोटा ग्राहकांना देऊ नये, असा सल्लाही रिझर्व्ह बँकेनं दिलाय. सामान्य नागरीक मात्र आपल्या रोजच्या व्यवहारांमध्ये २००५पूर्वीच्या नोटांचा वापर करू शकतो. त्यासाठी त्या बंद झाल्या नाही हे लक्षात असू द्यावं, असंही बँकेनं स्पष्ट केलंय.
कशी ओळखाल २००५ पूर्वीची नोट
सामान्य नागरिकासाठी २००५पूर्वीची नोट ओळखणं अतिशय सोपी आहे. या नोटेवर मागच्या बाजूला नोट छापण्याचं वर्ष लिहीलेलं असतं. २००५नंतर नोटांवर छापण्याचं वर्ष हे मागील बाजूला आणि खाली असतं. २००५नंतरच्या नोटांमध्ये सुरक्षेचे फिचर्स जास्त असतात ज्यामुळं खोट्या नोटांच्या वापरला आळा बसतो. सामान्य ग्राहकाला कोणत्याही प्रकारचा त्रास नोटा बदलतांना होवू नये यासाठी रिझर्व्ह बँक या प्रक्रियेवर लक्ष ठेवून असेल.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो
करा.