नवी दिल्ली : देशात नोटाबंदीनंतर डिजीटल पेमेंटला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने सुरु करण्यात आलेल्या लकी ड्रॉ योजनांचे निकाल जाहीर करण्यात आले.
या योजनेंतर्गत नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन इंडियाने(एनपीसीआय) ३.४२ लाखाहून अधिक विजेत्यांची घोषणा केलीये. या विजेत्यांना ५४.९० कोटी रुपयांची बक्षिसे मिळणार आहेत.
केंद्रसरकारने डिजीटल पेमेंटला प्रोत्साहन देण्याच्या हेतूने ही योजना सुरु केली होती. या योजनेमुळे केवळ तीन आठवड्यात ४५ जण लखपती झालेत.
एनपीसीआयने २५ डिसेंबरनंतर दर आठवड्याला अशा १५ लोकांच्या नावांची घोषणा केलीये ज्यांनी १,००,००० रुपयांची बक्षिसे जिंकलीत.
तर इतर ६१४ विजेत्यांनी ५०,००० आणि ६५०० विजेत्यांनी १० हजार रुपयांची बक्षिसे जिंकलीत. तर १५ हजाराहून अधिक लोकांना डिजीटल पेमेंटवर एक हजार रुपयांचे बक्षिस मिळालेय.
२५ डिसेबरला सरकारने लकी ग्राहक योजना आणि डिजीटल धन व्यापार योजनांची सुरुवात केली होती. लकी ड्रॉ योजना १४ एप्रिलपर्यंत सुरु राहणार आहे.
या लकी ड्रॉ मध्ये महाराष्ट्र, आंध्रप्रदेश, तमिलनाडू, उत्तरप्रद्रश आणि कर्नाटक या पाच राज्यातील विजेत्यांचे प्रमाण जास्त आहे.