सोन्याच्या दरात पुन्हा घ़सरण

गेल्या चार दिवसांपासून तेजीत असलेले सोन्याचे दर अखेर शनिवारी घसरले. राजधानी दिल्लीत शनिवारी सोन्याच्या दरात १०० रुपयांची घसरण पाहायला मिळाली. सोन्याचे दर प्रतितोळा २९,३५०वर पोहोचले होते.

Updated: Jan 15, 2017, 12:04 PM IST
सोन्याच्या दरात पुन्हा घ़सरण title=

नवी दिल्ली : गेल्या चार दिवसांपासून तेजीत असलेले सोन्याचे दर अखेर शनिवारी घसरले. राजधानी दिल्लीत शनिवारी सोन्याच्या दरात १०० रुपयांची घसरण पाहायला मिळाली. सोन्याचे दर प्रतितोळा २९,३५०वर पोहोचले होते.

सोन्याचे दर घसरले असले तरी चांदीच्या किंमतीत २५० रुपयांनी वाढ झाली. यासोबतच प्रतिकिलो चांदीचे दर ४१,२००वर पोहोचले. 

दिल्लीत ९९.९ आणि ९९.५ शुद्धतेच्या सोन्याचे दर प्रतितोळा अनुक्रमे २९,३५० आणि २९,२००वर बंद झाले. गेल्या चार दिवसांपासून सोन्याच्या दरात ७५० रुपयांची वाढ झाली होती.