स्मार्टफोनवरही ऑड-ईव्हन फॉर्म्यूला होणार लागू

दिल्ली सरकारने प्रदूषणावर नियंत्रण मिळवण्यासाठी ऑड-ईव्हन फॉर्म्यूलाचा वापर सुरु केलाय. या नियमाचा परिणाम दिल्ली युनिर्व्हसिटीच्या सेंट स्टीफन कॉलेमध्येही पाहायला मिळाला. 

Updated: Jan 16, 2016, 02:29 PM IST
स्मार्टफोनवरही ऑड-ईव्हन फॉर्म्यूला होणार लागू  title=

नवी दिल्ली : दिल्ली सरकारने प्रदूषणावर नियंत्रण मिळवण्यासाठी ऑड-ईव्हन फॉर्म्यूलाचा वापर सुरु केलाय. या नियमाचा परिणाम दिल्ली युनिर्व्हसिटीच्या सेंट स्टीफन कॉलेमध्येही पाहायला मिळाला. 

BGR.inच्या माहितीनुसार दिल्लीच्या सेंट स्टीफन्स कॉलेज त्यांच्या विद्यार्थ्यांसाठी स्मार्टफोन वापरासाठीही ऑड-ईव्हन नियम लागू करण्याच्या विचारात आहे. 

स्मार्टफोनचा अधिक वापर आरोग्यासाठी चांगला नव्हे. त्यामुळे हा निर्णय घेण्याबाबत कॉलेज विचाराधीन आहे. या योजनेनंतर विद्यार्थी रोज स्मार्टफोन आणू शकत नाहीत. 

याबाबत विद्यार्थ्याचे मत जाणून घेतले असता ७० टक्के विद्यार्थ्यांनी या योजनेस पाठिंबा दर्शवला.