आता राहुल गांधींची सोशल मीडियावर एंट्री!

मोठ्या सुट्टीनंतर देशात परतलेले काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी आता खूप सक्रीय झाले आहेत. पहिले केदारनाथची पायी यात्रा, जनरल बोगीमधून पंजाबला प्रवास, संसदेत भाषण आणि आता चक्क राहुल गांधींची सोशल मीडियावर एंट्री झालीय.

Updated: May 7, 2015, 01:16 PM IST
आता राहुल गांधींची सोशल मीडियावर एंट्री!  title=

नवी दिल्ली: मोठ्या सुट्टीनंतर देशात परतलेले काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी आता खूप सक्रीय झाले आहेत. पहिले केदारनाथची पायी यात्रा, जनरल बोगीमधून पंजाबला प्रवास, संसदेत भाषण आणि आता चक्क राहुल गांधींची सोशल मीडियावर एंट्री झालीय.

राहुल गांधी @offiveofRG नावानं ट्विटरवर आले आहेत. यात राहुल गांधींच्या पुढील उपक्रमांची माहिती देण्यात आलीय. ट्विटरवर येताच राहुलच्या फॉलोअर्सची संख्या १९ हजारांवर गेलीय. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी सोशल मीडियावर पहिलेपासूनच खूप सक्रीय आहेत. पीएम प्रत्येक छोट्या-मोठ्या निमित्ताबाबत ट्वीट करतात. आता राहुल गांधी ट्विटरवर आल्यानंतर नेटिझन्सही आपलं म्हणणं थेट राहुल गांधीपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करतील. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.