भारतीय पुरूषांची सेक्सच्या लालसेमुळे हिंसात्मक सायबर पॉर्नमध्ये वाढ

केंद्रीय अन्वेषण ब्युरोने एक धक्कादायक बाब पॉर्न व्हि़डिओसंदर्भात उघड केली आहे. भारतीय पुरूषांची काम पिपासू आणि लालसेमुले हिंसात्मक सायबर पॉर्नची वाढ झाली आहे. मीडियामध्ये आलेल्या काही रिपोर्टनुसार सीबीआयने गुरूवारी सुप्रीम कोर्टात सांगितले की, सध्याच्या व्यवस्थेत हिंसात्मक पॉर्नला बंद करणे खूप अवघड काम आहे. 

Updated: Oct 9, 2015, 03:37 PM IST
भारतीय पुरूषांची सेक्सच्या लालसेमुळे हिंसात्मक सायबर पॉर्नमध्ये वाढ title=

नवी दिल्ली : केंद्रीय अन्वेषण ब्युरोने एक धक्कादायक बाब पॉर्न व्हि़डिओसंदर्भात उघड केली आहे. भारतीय पुरूषांची काम पिपासू आणि लालसेमुले हिंसात्मक सायबर पॉर्नची वाढ झाली आहे. मीडियामध्ये आलेल्या काही रिपोर्टनुसार सीबीआयने गुरूवारी सुप्रीम कोर्टात सांगितले की, सध्याच्या व्यवस्थेत हिंसात्मक पॉर्नला बंद करणे खूप अवघड काम आहे. 

कोर्टात देण्यात आलेल्या अहवाल, म्हटले आहे की पुरूषांची कधी न पूर्ण होणारी सेक्सच्या लालसेची मागणी पूर्ण करण्यासाठी पॉर्न कंटेंट देणारे लोक आपल्या साइटमध्ये नेहमी बदल करत असता. यावर नियंत्रण ठेवणे खूप कठीण काम आहे. 

हे कटू सत्य आहे की सूचना आणि तंत्रज्ञान क्षेत्रात झालेल्या बदलांमुळे बलात्कार आणि गँगरेप सारख्या घटनांना वेगळं रूप दिलं आहे. सर्वात वाईट गोष्ट म्हणजे सायबर सेक्सचे स्वरूप असे बदलले आहे की त्याने राज्य आणि सीमांच्या बंधनात अडकलेले पोलीस यावर नियंत्रण करू शकत नाही. 

एखाद्या वेबसाइटला कंटेन्टमुळे ब्लॉक केले गेले तर तो कंटेन्ट दुसऱ्या किंवा तिसऱ्या साइटवर टाकला जातो हे काम बिदिक्तपणे सुरू आहे. 

भारतात सायबर सेक्स आणि हिंसात्मक पॉर्न प्रकरणात चौकशी आणि गु्हेगारांना पकडण्यासाठी सीबीआयने सुप्रीम कोर्टात म्हटले की, या प्रकरणाची चौकशी करण्यात आम्ही सक्षम आहोत पण जास्त करून गुन्हेगार दुसऱ्या देशातील आहेत.  

सीबीआयने सूचना दिली की इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हाइडर्स आणि सोशल नेटवर्कींग साइट्ससोबत काम करण्यासाठी सीबीआयचा एक अधिकारी तैनात केला पाहिजे. त्यामुळे त्वरित काम करण्यात मदत मिळेल. यासाठी सीबीआयने अमेरिकेचे उदाहरण दिले. त्या ठिकाणी इंटरनेट सर्व्हिस प्रोवाइडरसोबत एफबीआयचे अधिकारी नियुक्त केलेले असतात. 

बलात्कार, गँगरेपच्या घटनांमधून स्पष्ट होते की गु्हेगार पुरूष भारतीय महिलांसंदर्भात किती अमानवीय व्यवहार करतात. वीभत्स अपराध केल्यावर त्याची रेकॉर्डिंग करतात आणि त्याला इंटरनेटच्या माध्यमातून जगाला दाखवून इतर पुरूषांनाही भडकविण्याचे कामं करतात, असेही सीबीआयने आपल्या प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.