www.24tass.com , झी मीडिया, कोल्हापूर
एलओसीजवळील चौकीवर पाकिस्तान सैन्यानं केलेल्या गोळीबारात शहीद झालेल्या पाच जवानांमध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील कुंडलिक केरबा माने या ३६ वर्षीय जवानाचा समावेश आहे. कुंडलिक माने हे मराठा रेजिमेंटचे जवान होते. तर मराठा रेजिमेंटचे संभाजी कुंटे हे हल्ल्यात गंभीर जखमी झालेत. त्यांच्यावर लष्काराच्या रुग्णालयात उपचार सुरू आहे. त्यांच्यासह बिहार रेजिमंटचे 4 जवान हल्ल्यात शहीद झाले आहेत.
शहीद जवान कुंडलिक माने हे कोल्हापूरच्या कागल तालुक्यातील पिंगळगावचे रहिवासी होते. 13 वर्षांपूर्वी बेळगावच्या मराठा लाइट इन्फंट्रीमधून सैन्यात भरती झाले होते. त्यांच्या मागे आई नानूबाई, वडील केरबा तुकाराम माने, पत्नी राजश्री, मुलगी आरती (वय 9) आणि मुलगा अमोल (वय 7) असा परिवार आहे.
दरम्यान, शहीद कुंडलिक माने यांच्या कुटुंबीयांना राज्य सरकारनं 5 लाख रुपयांची मदत जाहीर केली. मदत व पुनर्वसन राज्यमंत्री सुरेश धस यांनी मुंबईत पत्रकार परिषदेत ही घोषणा केली. मानेंच्या कुटुंबियांना जास्तीत जास्त मदत मिळवून देण्याचं आश्वासनही धस यांनी दिलं.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.