कांद्यानं केला दिल्लीकरांचा वांदा, 'नाशिक'ला हाक?

कांद्यानं दिल्लीत सेंच्युरी गाठल्यानं सत्ताधारी काँग्रेस सरकारच्या पायाखालची जमीन सरकलीय. कांद्याच्या दरावर नियंत्रण मिळवण्यासाठी थेट नाशिकमधून दिल्लीला कांदा पुरवण्याच्या जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Oct 24, 2013, 07:34 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, नाशिक/नवी दिल्ली
कांद्यानं दिल्लीत सेंच्युरी गाठल्यानं सत्ताधारी काँग्रेस सरकारच्या पायाखालची जमीन सरकलीय. कांद्याच्या दरावर नियंत्रण मिळवण्यासाठी थेट नाशिकमधून दिल्लीला कांदा पुरवण्याच्या जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत. यासंदर्भात आज केंद्राची चार सदस्यीय समितीची नाशिकमध्ये बैठकही झाली.
मात्र, नाशिकमध्येही कांद्याची वेगळी परिस्थिती नाही. नाशिक जिल्ह्यात कांद्याचे भाव प्रति क्विंटल सहा हजारांवर पोहचले आहेत. तर कमी दर्जाचा लाल कांदा चार ते पाच हजारांवर आहे. आवक कमी झाल्यामुळंच देशांतर्गत कांद्याचे भाव भडकले आहेत. त्यामुळं दर नियंत्रणात ठेवण्यासाठी सरकारची चांगलीच धावपळ सुरू आहे.
नाशिक जिल्ह्यात कांद्याचे भाव सध्या आकशाला भिडले आहेत. आज उन्हाळी कांदा सहा हजार तर कमी दर्जाचा असलेला लाल कांदा चार ते पाच हाजर रुपये भाव मिळतो आहे. कांद्याची आवक कमी झाल्याने देशांतगत भाव भडकले असून दिल्लीत काद्याने शंभरी गाठली आहे. त्यामुळे केंद्रीय स्तरावर पणन आणि कृषी मंत्रालयात धावपळ सुरु झाली आहे. नाशिकमध्ये बुधवारी कृषी आयुक्तांनी आढवा घेतला आहे तर आज केंद्रीय पणन सचीव बैठक घेणार आहेत. कांद्याची आवक कमी झाल्याने मागणी कशी भरून काढता येईल यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरु आहेत.

पंतप्रधानांना पोस्टानं पाठवला कांदा
दरम्यान, कांद्याच्या वाढलेल्या किमतींना यूपीए सरकार जबाबदार असून १३ बड्या कांदा व्यापाऱ्याचे यूपीए नेत्यांशी लागेबांधे आहेत. या व्यापाऱ्यांच्या संगनमताने ऐन सनासुदीच्या दिवसात कांद्याची भाववाढ केल्याचा आरोप भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी केलाय. सर्वसामान्याच्या डोळ्यात पाणी आणणाऱ्या कांद्याचं पार्सल पंतप्रधान मनमोहन सिंग आणि कृषीमंत्री शरद पवार यांनी दिवाळी भेट म्हणून पोस्ट करत सोमय्या यांनी आपली निषेध नोंदवला.

कांद्याच्या दरवाढीवर केंद्र आणि राज्य सरकार एकमेकांकडे बोट दाखवत आहेत. दोन्हीकडे काँग्रेसचंच सरकार आहे. काँग्रेस जनतेची कशा पद्धतीनं फसवणूक करते, याचं हे उदाहरण आहे, असा टोला भाजपचे माजी अध्यक्ष नितीन गडकरी यांनी लगावलाय.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.