आता, सकाळी ८ ते रात्री ८ वाजेपर्यंत करा ऑनलाईन फंड ट्रान्सफर!

रिझर्व्ह बँकेनं 'आरटीजीएस' प्रणालीच्या माध्यमातून कारभाराची वेळ वाढविण्यासंबंधी एक सर्क्युलर जाहीर केलंय.

Updated: Dec 16, 2014, 09:40 AM IST
आता, सकाळी ८ ते रात्री ८ वाजेपर्यंत करा ऑनलाईन फंड ट्रान्सफर! title=

मुंबई : रिझर्व्ह बँकेनं 'आरटीजीएस' प्रणालीच्या माध्यमातून कारभाराची वेळ वाढविण्यासंबंधी एक सर्क्युलर जाहीर केलंय.

त्यामुळे, आता ऑनलाईन फंड ट्रान्सफर सोमवार ते शुक्रवारपर्यंत सकाळी ८ ते रात्री ८ वाजेपर्यंत होऊ शकेल. तर, शनिवारी ही सुविधा सकाळी ८ वाजल्यापासून दुपारी ३.३० वाजेपर्यंत मिळू शकेल. ही नवी व्यवस्था २९ डिसेंबरपासून लागू होईल. इलेक्ट्रॉनिक माध्यमातून ट्रान्झॅक्शन वाढण्यासाठी 'आरबीआय'नं हे बदल केलेत. 

रिझर्व्ह बँकेनं ग्राहकांच्या वाढत्या गरजा लक्षात घेता रोख रक्कम उपलब्ध करून देण्यासाठी ऑक्टोबर २०१३ मध्ये 'आरटीजीएस' म्हणजेच 'रिअल टाईम ग्रास सेटलमेंट' प्रणाली सुरू केलीय. या माध्यमातून ऑनलाईन रक्कम ट्रान्सफर करण्याची कमीत कमी रक्कम दोन लाख रुपये आहे. तर, दोन लाखांहून कमी रक्कम ‘एनईएफटी’च्या (नॅशनल इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर) माध्यमातून ट्रान्सफर केली जाऊ शकते.  

सध्या, ही सुविधा सोमवार ते शुक्रवारपर्यंत ९ वाजल्यापासून सायंकाळी ४.३० वाजेपर्यंतच उपलब्ध आहे. तर शनिवारी दुपारी २ वाजेपर्यंत ऑनलाईन फंड ट्रान्सफरची सुविधा मिळते.  

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.